Skip to content Skip to footer

अबब !! कोल्हापूरकरांना आता घरात सुद्धा मास्क वापरावा लागणार ?

अबब !! कोल्हापूरकरांना आता घरात सुद्धा मास्क वापरावा लागणार ?

कोल्हापुर महानगर पालिका क्षेत्रातील लोकांना आता घर सुद्धा मास्क वापरावा लागणार आहे. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भातल्या सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे बाहेर तर मास्क वापरावा लागेलच, मात्र त्यापाठोपाठ आता कोल्हापूरकरांना घरामध्ये देखील मास्क वापरावा लागणार आहे.

सध्या कोल्हापूर शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाणही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. शहरामध्ये वाढणारा होणारा कोरोना आता कोल्हापुराच्या ग्रामीण भागात सुद्धा पोहचलेला दिसून येत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे.

कोल्हापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी पालिकेचे आयुक्त कलशेट्टी यांनी हा एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. घरात कमी जागा असेल आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या जर जास्त असेल, तसेच घरात वयोवृद्ध व्यक्ती असेल तर घरात सुद्धा मास्क वापरणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5