Skip to content Skip to footer

“शिवसेना दसरा मेळावा” : सायंकाळी ७:०० पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना संबोधित


“शिवसेना दसरा मेळावा” : सायंकाळी ७:०० पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना संबोधित

यंदा राज्यावरच नाही तर संपूर्ण जगभरावर कोरोना संसर्गाचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच मिशन बिगिन अगेन अंतर्गत सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्यावरही कोरोनाचे संकट उभे ठाटले आहे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेता शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थावर न होता तो तेथूनच जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगमुळे या मेळाव्याला मोजक्याच निमंत्रितांना प्रवेश दिला जाणार आहे.

मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याला खुप महत्व प्राप्त झालेले आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री झाल्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. रविवारी होणाऱ्या दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे शिवसैनिक, संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच विरोधकांचे सुद्धा लक्ष लागले आहे.

परंपरेनुसार या मेळाव्यात शस्त्रपूजन होईल. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी ७ वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. सोबतच शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही शिवसैनिकांशी संवाद साधतील, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5