Skip to content Skip to footer

बळकटीकरणासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र उपयुक्त ठरतील – दादाजी भुसे

बळकटीकरणासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र उपयुक्त ठरतील – दादाजी भुसे

ऑक्सिजनचे महत्त्व कोरोनाने अधोरेखित केले असून, ऑक्सिजन केंद्रीत करणारी यंत्रणा ही काळाची गरज झाली आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्र ही आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

सामान्य रुग्णालयात टेमसेक फाऊंडेशन इंटरनॅशनल कंपनी, सिंगापूर यांच्याकडून रत्ना निधी स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक दायित्व निधीतून प्राप्त झालेल्या पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्राचे लोकार्पण मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोलत होते.

कोरोनाच्या कालावधीत औद्योगिक वापरासाठी लागणारा ऑक्सिजन राखीव ठेवत रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील आरोग्य प्रशासनाने चांगले योगदान दिले आहे. सामान्य रुग्णालयामार्फत चांगली रुग्णसेवा देताना रुग्णालयाचा परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a comment

0.0/5