Skip to content Skip to footer

ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्हापरिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. या बातमीमुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती. रणजित सिंह डिसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली होती.

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरूजींकडे राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारसोबत काम करण्याची अपेक्षा व्यक्त करून दाखवली. त्यानुसार डिसले यांनी तसा आराखडाही सरकारला सादर करणार आहेत.

Leave a comment

0.0/5