विष्णू सावरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार देवेंद्र फडणीवस आणि चंद्रकांत पाटील
माजी आदिवासी विकास राज्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते विष्णू सावरा यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. तर अंत्यदर्शनासाठी तेथे ठेवून, दुपारी १ वाजता वाडा इथल्या शिदेश्वर नदीकाठी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तर विष्णू सवरा यांच्या अंत्यविधीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर आमदार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विष्णू सावरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपमधील अनेक दिग्गज मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.
खरंतर, विष्णू सावरा यांचे असे अकाली जाणं हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले आणि आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांना दोन वर्षांपासून यकृताच्या आजाराने ग्रासले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सवरा यांच्या निधनाने संवेदनशील, कर्तव्यदक्ष नेता हरपल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.