Skip to content Skip to footer

पीडितेवर झालेल्या हल्ल्याची शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पीडितेवर झालेल्या हल्ल्याची शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

वाशी पुलावर एका तरुणीवर अत्याचार करून फेकून दिल्याची घटना आज सकाळी घडली होती. या पीडितेवर अत्याचार करून तिला मारहाण करून वाशी पुलावर फेकून देण्यात आले होते. या घडलेल्या घटनेविरोधात रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तात्काळ शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे.

या संदर्भात डॉ नीलम गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणी माहिती घेतली. तसेच पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मदत करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पीडित मुलीवर सध्या मुंबई येथे उपचार सुरु असून ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिचा जबाब घेण्यात आलेला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील असे सेनगावकर यांनी डॉ गोऱ्हे यांना सांगितले आहे.

सेनगावकर आणि रेल्वे पोलिसांनी तत्परतेने केलेले काम समाधानकारक आहे. तसेच या घडलेल्या घटने संदर्भात डॉ गोऱ्हे यांनी आरोपींना पाकडण्याचे निर्देश दिले आहे. तसेच पीडितेला मदत मिळण्यासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. तसेच गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देखील पाठविले आहे.

Leave a comment

0.0/5