Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची दिली धमकी

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची दिली धमकी

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी जयंत रामचंद्र पाटील (रा. सांगली) या व्यक्तीने दिलेली आहे. या संदर्भात पाटील विरोधात सिंहगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली आहे.

रुपाली चाकणकर यांचे धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी सरळ सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन गाठले आणि सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a comment

0.0/5