Skip to content Skip to footer

३० वर्षांत मुंबईमध्ये होणार असलेल्या संभाव्य बदल संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांचा बैठकांचा सपाटा

३० वर्षांत मुंबईमध्ये होणार असलेल्या संभाव्य बदल संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांचा बैठकांचा सपाटा

पर्यावरण, पर्यटनमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज शहरातील वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यावर चर्चा करण्यासाठी बैठका औजीत केल्या होत्या. पुढील ३० वर्षांत मुंबईमध्ये होणार असलेले संभाव्य बदल समोर ठेवून चर्चा केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात राबवले जाणारे फल्डींग प्लॅनिंग, इंटिग्रेटेड ट्रांन्सपोर्ट हब यासारख्या प्रकल्पावरसुद्धा त्यांनी यावेळी चर्चा केली.

मुंबईमध्ये रोज हजारो नागरिक स्थानिक आणि इतर राज्यातून येत येतात. त्यांची वाहतूक करण्यासाठी कित्येक बस आणि वाहनं शहरात येतात. ही वाहने उभी करण्यासाठी शहरात जागा नाही. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये ही वाहनं पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना राहण्यासाठी जागा नाहीये. ही अडचण दूर व्हावी यासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

यामध्ये मुंबईच्या इंन्ट्री पॉईन्ट्सजवळ हे इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येतील. या ट्रान्सपोर्ट हबजवळ ही वाहन येऊन थांबतील. त्यानंतर मग मुंबई मेट्रो, बेस्टच्या माध्यमातून या प्रवाशांना मुंबईत प्रवास करता येईल, याची प्लॅनिगं आजच्या बैठकीत झाल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या अखेरला या कामासाठी टेन्डर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5