Skip to content Skip to footer

सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल – उद्धव ठाकरे

सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल – उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटना झालेल्या जागेची पाहणी केली त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामरांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.

पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते.

Leave a comment

0.0/5