Skip to content Skip to footer

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…

गेल्या वर्षी कोरोना रोगाने हाहाकार माजवला होता. देशासह संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे हे महत्वाचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली होती.

तर, चारचाकी वाहनातून प्रवास करताना देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं होतं. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई देखील केली होती. पुण्यात देखील अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुणेकरांना कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनांतून प्रवास करताना मास्क गरजेचा नसल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे.

यासंदर्भात त्यांनी ट्विट करून देखील माहिती दिली आहे. ‘चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही ! कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात !’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत. आता चारचाकी वाहनात मास्क घालणं गरजेचं नसलं तरी ते वाहन खाजगी असण्यासोबतच प्रवास करताना सोबतच्या व्यक्ती या कुटुंबातीलच असाव्यात अशी आत देखील घालण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5