Skip to content Skip to footer

शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा, उपमुख्यमत्र्यांचे जनतेला आवाहन

शिवजयंती साधेपणाने आणि उत्साहात साजरी करा, उपमुख्यमत्र्यांचे जनतेला आवाहन

कोरोनाच्या संकटामुळे सर्व सण अत्यंत सध्या पद्धतीने आणि नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने यापूर्वीच केले होते. त्यात संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण सुरु झाले असले तर अदयाप कोरोनाचे संकट टळलेला नाही त्यामुळे येत्या महिन्याभरात येणारे सण त्यात यंदाची शिवजयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे जनतेला आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.

गेल्या वर्षी मार्चपासून करोनाचं संकट आलं. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे केले. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंतीही साधेपणाने साजरी करू, शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे”, असं अजित पवार म्हणाले.
तसेच, शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी शिवनेरीवर जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5