Skip to content Skip to footer

राज्यसभेच्या जागांसाठी होणार २६ मार्चला मतदान !!

येत्या २६ मार्चला देशभरातील ५५ तर राज्यातील ७ जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण १७ राज्यांतून ५५ सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. येत्या महिनाभरात मतदान तर त्याच दिवशी म्हणजे २६ मार्चला संध्याकाळी ५ वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकी नंतर राज्यसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपा पक्षात चुरस पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपाचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे.

विधानसभा निवडणुकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात युती होऊन महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आता हिच आघाडी राज्यसभा निवडणुकीला महाराष्ट्रात दिसून येणार आहे. त्यामुळे ७ पैकी ५ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून राज्यसभेवर ७ जण निवडून जाणार असून, त्यात ५ जागा अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते गरजेची आहेत. त्यामुळे आघाडीचे ४ तर भाजपचे २ उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यात भाजपा छत्रपती उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन मंत्री पद देण्याच्या तयारीत आहे.

Leave a comment

0.0/5