Skip to content Skip to footer

राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये शिवसेनेला स्थान द्या – प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आपल्या सहपरिवारासह रामजन्म भूमी येथे रामलल्लाचे दर्शन आज घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना पक्षाच्या एका सदस्याला सुद्धा राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये समाविष्ट करून घ्यावे, असे पत्र लिहिले आहे. “राम मंदिर आंदोलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे योगदान पाहता शिवसेनेला राम मंदिर ट्रस्टमध्ये स्थान द्यावे”, असं सरनाईक यांनी पत्रात लिहिले आहे.

महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करुन १०० दिवस पूर्ण झाल्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. सहकुटुंब ते तेथे जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदी किनारी आरतीमध्ये सहभागी होतील, असं म्हटलं जात होते. परंतु कोरोना वायरसच्या संकटामुळे हा नियोजित दौरा रद्द करण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता, त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि शिवसेना नेते सुद्धा सामील झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या दोऱ्यापूर्वी मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. विशेष रेल्वे गाडीने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. तसेच उत्तरप्रदेशमधील शिवसैनिक अयोध्या पोहचत आहेत.

Leave a comment

0.0/5