Skip to content Skip to footer

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट योगी आदित्यनाथ यांना इशारा.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट योगी आदित्यनाथ यांना इशारा.

यापुढे उत्तरप्रदेश मधील कामगारांची महाराष्ट्राला गरज असेल तर आमची परवानगी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली होती. योगींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. “उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल”, असं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल, तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं.” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले होते. महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. त्यावेळीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती.

परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील, तेव्हा त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो, असं राज ठाकरे म्हणाले होते

Leave a comment

0.0/5