Skip to content Skip to footer

“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”

स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा मोदींना टोला

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. इतकंच नाही तर दोन महिन्यांनी येणाऱ्या केंद्रीय पथकावरही त्यांनी टीका केली आहे. “महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिने सहा दिवसांनी केंद्रीय पथक आलं आहे. आता शिवारात जाऊन ते काय बघणार? शेतकऱ्यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन जमिनीची साफसफाई करुन हरभरा, ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल  फसल तो बहुत अच्छी है इनको मदत करनेकी जरुरत नहीं” असं म्हणत राजू शेट्टींनी केंद्रीय पथकावरही टीका केली आहे.

 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. यानंतर आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी पथक आलं आहे. त्यावरुन राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःचा उल्लेख चौकीदार असा करतात. त्यावरुन राजू शेट्टी यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही केंद्राच्या पथकालाही त्यांनी टोला लगावला आहे. दोन महिन्यांनी हे पथक आलं आहे ते शिवारात जाऊन काय बघणार असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Leave a comment

0.0/5