Skip to content Skip to footer

ममता बॅनर्जी यांचा शरद पवारांना फोन, नव्या राजकीत चर्चेला सुरवात

पश्चिम बंगालमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही भारतीय जनता पक्षात आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात होणार आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष अधिक वाढत असलेला दिसून येत आहे, त्यात ममता बॅनर्जी कोलकत्ता येथे नव्या वर्षात एक रॅली आयोजित करणार आहे.

मुख्यमंत्री ममता यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, शरद पवारांशी चर्चेदरम्यान ममतांनी त्यांना आमंत्रणही दिले आहे. यावेळी इतर विरोधी पक्षातील नेते देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5