Skip to content Skip to footer

भारताकडून लस निर्यातीला परवानगी नाही – आदर पुनावाला

भारताकडून लस निर्यातीला परवानगी नाही – आदर पुनावाला

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्राझेनेका संशोधित आणि सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ‘कोविशिल्ड’ या लसीवर केंद्र सरकारने पुढील काही महिन्यांसाठी निर्यात बंदी केली आहे, अशी माहिती सीरमचे प्रमुख अदर पूनावाला यांनी रविवारी दिली.
पूनावाला यांच्या संस्थेने विकसनशील देशांसाठी सुमारे १०० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून प्रामुख्याने विकसनशील देशांसाठी डोस तयार केले जातात. भारतानं निर्यातबंदी केल्याने गरीब देशांना आणखी काही काळ लसीच्या पहिल्या डोससाठी वाट पहावी लागणार आहे, अशी माहिती पुनावाला यांनी दिलेली आहे.

भारतीय नियामक मंडळाने रविवारी कोविशिल्डच्या आत्पकालिन वापरासाठी परवानगी दिली. मात्र, यासाठी एक अट घालण्यात आली आहे, ती म्हणजे भारतातील मोठ्या लोकसंख्येला या लसीद्वारे सुरक्षा प्राप्त झाल्याचे निश्चित होईपर्यंत सीरमला ही लस निर्यात करता येणार नाही, अदर पूनावाल यांनी असोसिएट प्रेसशी फोनवरुन संवाद साधताना ही माहिती दिली.

Leave a comment

0.0/5