Skip to content Skip to footer

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाउंट बंद

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युट्युब अकाउंट बंद

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील संसद भवनातील आंदोलन चांगलेच भोवण्याचे चिन्ह दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या काही प्लॅटफॉर्मवरती ट्रम्प यांना कायमस्वरूपाची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर आता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी त्यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. ‘सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन व्हिडीओ काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे, असे यूट्यूबने स्पष्टीकरण दिले आहे.

अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले आहे.

Leave a comment

0.0/5