Skip to content Skip to footer

कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचार आरोपांची चौकशी होणार – एकनाथ शिंदे

कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचार आरोपांची चौकशी होणार – एकनाथ शिंदे

चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन कंत्राट वादग्रस्त ठरले आहे. स्वयंभू नामक कंपनीला आधीचे कंत्राट रद्द करून जास्त दरात हे कंत्राट मंजूर करण्यात आले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

वरोरा येथे शिवसेनेच्या मेळाव्याला ते आले असता त्यांनी यावर सूचक भाष्य केले आहे. चंद्रपूर मनपाच्या कचरा संकलन कंत्राटाची तक्रार प्राप्त झाली आहे, त्या दृष्टीने नगरविकास खात्याच्या माध्यमातून पाहणी सुरू आहे. जर या कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले तर नक्कीच यावर कारवाई करणार’, अशी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

पूर्वीच्या कंपनीचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कचरा संकलनाच्या संबंधात निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये ६ पैकी दोन कंपन्या तांत्रिक दृष्टीने बाद झाल्याने चार कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने सर्वात कमी म्हणजे १७०० रुपये प्रति टन कचरा यानुसार किंमत लावली.

कंपनीने सर्व आर्थिक गणित जुळवूनच ह्या कंत्राटाची निविदा भरली. मात्र इतक्या कमी किमतीत हे काम होऊ शकत नाही हे कंपनीच्या आधी स्थायी समितीला कळलं. त्यामुळे समितीनेच ही निविदा रद्द केली. यानंतर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात नव्याने निविदा मागविण्यात आल्या. यात स्वयंभू कंपनीला २५०० रुपये प्रतिटन याप्रमाणे कचरा संकलनाचे कंत्राट देण्याला मंजुरी देण्यात आली होती.

Leave a comment

0.0/5