Skip to content Skip to footer

माढा मधून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाही

माढा मतदार संघाला सध्या इतर मतदार संघा पेक्षा जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी माढा मतदार संघातून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होते परंतु कालांतराने माढा मतदार संघातून माघार सुद्धा घेतलेली होती. राष्ट्रवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत. परंतु या दोन्ही यादीत माढा मतदार संघा बद्दल मौन बाळगले आहे. त्यामुळे ही जागा विजयसिह मोहिते-पाटील यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात होती.

आज जाहीर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादी मध्ये माढा मतदार संघातून खासदार विजय सिंह मोहिते-पाटील यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे विजय सिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. यावेळी मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे. माढा मतदार संघातून प्रभाकर देशमुख यांचे नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाराज विजयसिंह मोहिते – पाटील हे अन्य पर्यायाचा विचार करू शकतात का? तसेच केवळ पक्षावर दबावासाठी सर्व सुरू आहे? याकडे देखील सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

माढामधून विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. दरम्यान, मोहिते-पाटील यांनी त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण, राष्ट्रवादीतील नेत्यांचा मात्र त्याला रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता विजयसिंह मोहिते-पाटील आता काय भूमिका घेणार? तसेच माढातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? हे पाहावे लागणार आहे. काही दिवसापूर्वी रणजित सिह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे रणजित सिह मोहिते-पाटील भाजपा पक्षात जाणार का? या चर्चा सुद्धा चालू झालेल्या आहे.

Leave a comment

0.0/5