Skip to content Skip to footer

कर्नाटक काँग्रेस आमदार बी. नारायण यांचे मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीचा काळ जसा-जसा जवळ येऊ लागतो तसे प्रत्येक पक्षातील नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतच असतात. त्यातच कर्नाटक काँग्रेसचे आमदार बी. नारायण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. सोमवारी कलबुर्गी येथे झालेल्या काँग्रेस सभेत टीका करत असताना नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही असे वादग्रस्त विधान आमदार बी नारायण राव यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाहीत, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली. कलबुर्गी येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या आगमनापूर्वी बी नारायण राव यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.

पुढे राहुल गांधी यांनीसुद्धा आपल्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेताना ” स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची चोरी पकडली जाताच, आता ते सारे भारतीयच चौकीदार असल्याचे सांगू लागले आहेत, पंतप्रधान होताच मोदी यांनी स्वत:ला ‘चौकीदार’ म्हणवून घेत प्रत्यक्षात मात्र काही ठरावीक श्रीमंतांची चौकीदारी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी केवळ चोरच नाहीत, तर ते खोटेही बोलतात” असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनो कर्नाटक येथे झालेल्या सभेत मोदी यांचावर हल्ला चढविला.

काँग्रेस आमदार बी. नारायण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण देशात काँग्रेस आणि बी. नारायण यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. आज आरोप करताना नेत्यांनी आपली पातळी बघूनच आरोप करावे असेच आज राजकीय विशेलषक यांनी आपले मत मांडलेले आहे. यावर काँग्रेस पक्ष आमदार बी. नारायण यांच्यावर कारवाही करणार का? हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईल परंतु या सर्व प्रकरणावर कर्नाटकातील भाजपा नेते काय कृती करणार हे येणाऱ्या दिवसात समोर येईल. परंतु आज पुन्हा राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना काय बोलावे या विषयांचे धडे द्यावे ही वेळ काँग्रेस पक्षावर पुन्हा आलेली आहे.

Leave a comment

0.0/5