मुंबई – राजकारणातील आज एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपसोबतशी जोडलं गेलं आहेत. हा आनंदाचा क्षण आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे रणजितसिहं यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवें ,मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
आता आपलं सरकार येणार आहे आणि रणजित सिह यांच्या येण्याने माढाचा खासदार भाजपाचाच होणार आहे. विजय सिंह मोहिते पाटील हें आमच्या बरोबर आहेत. आता ४५ नाही तर ४८ जागांसाठी प्रयत्न करणार,मोहिते-पाटील घराण्याला योग्य मान देणार आणि आता पुढची चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात येत्या निवडणुकीत मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.