बारामतीत सर्वाधिक २ लाख ३२ हजार मतदानात वाढ कोणाच्या वाटेला?

लोकसभा | Baramat-highest-2-lakh-3

लोकसभा निवडणुकीच्या चारही टप्प्यांत मिळून राज्यात सरासरी ६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत मतदानाचे प्रमाण सरासरी सारखेच असले तरी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या २०१९ च्या निवडणुकीत वाढली आहे. लोकसभा मतदार संघनिहाय विचार केल्यास वाढलेले मत‘दान’ कुणाच्या झोळीत पडणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

मतदानाची आकडेवारी पाहता बारामती मतदारसंघात मागील लोकसभेच्या तुलनेत पावणेतीन टक्के मतदान अधिक झाले आहे. मतदारसंख्येचा विचार करता राज्यात सर्वाधिक ३ लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ बारामतीत झाली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये मागील लोकसभेच्या तुलनेत सरासरी चार टक्के मतदान कमी झाल्याचे दिसत असले तरी मागील वेळेपक्षा ८४० मते अधिक असल्याचे दिसून येत आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बारमतीबरोबर मावळ मतदारसंघातील लढाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार येथून नशीब अजमावत आहेत. या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीएवढेच सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. मागील वेळेच्या तुलनेत १ लाख ९२ हजार ४३८ मतदान वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी जवळपास पाच टक्क्यांनी कमी झालेली आहे. मात्र येथे प्रत्यक्षात ४० हजार १६४ मतदान हे अधिक झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here