Skip to content Skip to footer

निवडूक आयोगाने फेटाळले ईव्हीएम बाबतचे सर्व आरोप…..

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि शेवटच्या चरण पर्यंत काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष असलेले सर्व राजकीय नेते ईव्हीएम खापर फोडत होते. दोन दिवसापूर्वी मतदानाच्या अंतिम टप्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्सझिट पोलच्या सर्वेक्षणा नुसार भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु विरोधक मात्र अजूनही इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

आज सकाळीच ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडूंनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. एक्झिट पोलच्या गॉसिपवर माझा विश्वास नाही. एक्झिट पोलच्या गोंधळात हजारो ईव्हीएम बदलण्याचा किंवा त्यांच्यात फेरफार करण्याचा डाव दिसतोय. असे मत ममता बॅनर्जींनी पत्रकारानं समोर मांडलेले होते. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत तसेच ईव्हीएमवर जनतेचा विश्वास असल्याचे मत सुद्धा मांडले होते.

मतदान झालेली ईव्हीएम सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये सीलबंद करण्यात आले असून त्याचं चित्रीकरणही केले गेले आहे. जिथे ईव्हीएम ठेवली जातात, त्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्थाही आहे. उमेदवार आणि त्यांच्या एका प्रतिनिधीला या खोलीच्या सीसीटीव्ही फुटेजवर नजरही ठेवता येते,” असे निवेदन निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5