भाजपात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला रोज फोन करत असतात तसेच महाराष्ट्रात काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुद्धा मुख्यमंत्री करत आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आरोप लावलेला आहे. इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे. पुढे राष्ट्रवादीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.