Skip to content Skip to footer

काँग्रेसच्या “एकला चलो रे” च्या भूमिकेवर अजित पवार यांचे मत……

. मात्र या चर्चा सत्रांमधून संभ्रमाच वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या बैठकीत काही नेत्यांनी वेगळं लढले पाहिजे असा सूर लावला आहे. मात्र यावर अजित पवार यांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणतात की, स्वतंत्र लढू असे मत व्यक्त करणाऱ्यांच्या मताला काहीही किंमत नाही. आम्ही काँग्रेसला मदत केली हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. एकत्रच राहील पाहिजे त्यातच दोघांचंही भले आहे. काँग्रेसने काय चर्चा करावी हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिके मध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी चिंतन बैठका घेत पराभवाची कारणं शोधायला सुरूवात केली आहे. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीकरता देखील तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेसनं घेतलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर निघाला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर देखील या बैठकीमध्ये निघाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यापेक्षा वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशी मागणी यावेळी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केली.

Leave a comment

0.0/5