नाशिक जिह्यातील मनमाड शहर व परिसरात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला मान्सूनने सलामी दिली. तर येवला शहर, राजापूर, ममदापूर, नगरसूल येथे गारांचा पाऊस झाला. अंदरसूल येथेही जोरदार पाऊस झाला. वादळामुळे झाडे उन्मळून पडली. उघडय़ावर असलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. विंचूर, लासलगाव येथे जोरदार वादळी पाऊस झाला. खळ्यावर व शेतात पाणी शिरल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले. तुफानी वादळी वाऱ्यासह पडलेल्या गारांच्या पावसामुळे विजेचे खांब वाकले. झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक तब्बल दीड तास खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर विंचूर, लासलगाव येथे वादळी पाऊस झाला, तर येवला शहर परिसरात गारांचा पाऊस झाला. कांदा पिकाचे यामुळे मोठे नुकसान झाले.