Skip to content Skip to footer

पक्षातून विरोध असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करणार……..

लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेस कंमेटीच्या बैठकीत राष्ट्रवादी बरोबर युती नको त्यापेक्षा वंचित बरोबर आघाडी चालेल अशी हाक सर्वच युवक  काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेली होती. विधानसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेसची दोन दिवसांची बैठक मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही अशी तक्रार काँग्रेसच्या काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केली.

मात्र विधानसभा निवडणुकीत वेगळं लढणं काँग्रेससाठी धोकादायक ठरू शकतं अशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळं लढण्याचा आग्रह धरला असला तरी पक्षाच्या हितासाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची दोन दिवसांची बैठक मुंबईतील टिळक भवन या पक्षाच्या मुख्यालयात सुरू आहे.

या बैठकीत काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीविरोधात तक्रारी केल्या. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करता भाजपाच्या उमेदवाराला मदत केल्याची तक्रार काही जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केली. तसंच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी न करता वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याचीही मागणी केली. मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याची भूमिका मांडली असली तरी आघाडी झाली नाही तर काँग्रेसला जास्त फटका बसू शकतो, अशी पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या मानसिकतेत आहे.

Leave a comment

0.0/5