लोकसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपच्या घवघवीत यशानंतर या दोन्ही पक्षाची युती कशी तुटेल यासाठी महाराष्ट्रातील काही पक्ष दोन्ही पक्षाचा अपप्रचार करत आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव सर्वस्थानी आहे. सध्या जागा वाटपावरून शिवसेना-भाजपात वादीवाद चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ही युती टिकणार नाही असा अपप्रचार खुद्द शरद पवार करत असताना दिसत आहे. तसे प्रसार माध्यमाशी बोलताना सुद्धा या विषयावर ते बोलून दाखवत आहे.
विरोधकांच्या या प्रश्नाला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडे-तोड उत्तर दिलेलं आहे.
विधानसभेचं जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद याबाबत माझं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं सुरु आहे. आपल्याला युतीतच लढायचं आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडली. त्यामुळे विधासभेला शिवसेना-भाजपा एकत्र लादणार असल्याचे आता पक्के झाले आहे.