Skip to content Skip to footer

बसपाच्या पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण

अमरावती – अमरावतीमध्ये बुहजन समाज पार्टीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना कार्यकर्त्यांनी लाथा-बुक्क्यांसह खुर्च्या फेकून मारहाण केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी अमरावती जिल्ह्यातील निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी बसपाची शासकीय विश्रामगृहात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उत्तरप्रदेश येथून आलेले महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांची सुद्धा उपस्थिती होती. बैठकीत नेत्यांनी मार्गदर्शनाला सुरवात करताच, स्थानिक कार्यकर्त्यांनी तुम्ही पक्षात दलाली करीत आहे असा आरोप करत लाथा-बुक्क्यांसह खुर्च्या फेकून मारहाण केली. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना अक्षरशा कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यातील काही पदाधिकाऱ्यांनी तेथून पळ काढत
लोकसभा निवडणुकीतही या नेत्यांनी पक्ष विकल्याचा आरोप सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसपाला एकही जागा मिळाली नाही. तर दर निवडणूकीत पक्ष तिकीट विकून पक्षात दलाली करीत असून पदाधिकारी केवळ पैसे कमावून समाजाला विकत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5