Skip to content Skip to footer

सेनेचे कार्य काँग्रेसने आपल्या नावावर खपविले…..

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाला जशी उतरती कळाच लागली आहे. जिथे पक्षाचे बडे छोटे-बडे नेते इतर पक्षात प्रवेश करत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेतेच आणि कार्यकर्ते इतर पक्षाच्या कामाचे श्रेय आपल्या नावावर खपवत असताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार वडाळा येथील “प्रती पंढरपूर” हे नाव तेथील मोनो स्थानकाला देण्याच्या श्रेय वादावरून दिसून येत आहे. वडाळा प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल-रखुमाई मंदिर हे अतिशय जुने मंदिर आहे. मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्याच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात मोठया संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.

हे मंदिर ४०० वर्षांपेक्षा जुने असल्याची शासनदरबारी नोंद आहे. या मंदिराला सतराव्या शतकात संत तुकारामांनी भेट दिल्याचीही नोंद आहे. परंतु मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रस्तावित मोनोरेलच्या या स्थानकाला दादर (पूर्व) हे नाव देण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून काही अंतरावर ‘दादर’ स्थानक असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या मोनो रेल्वे स्थानकाला ‘प्रतिपंढरपूर’ नाव द्यावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
परंतु काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार केलेला दिसून आला आहे. आज आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर स्थानकासाठी काँग्रेस पक्षानेच प्रति पंढरपूर स्थानकांची मागणी केली आहे अशा आशयाचे बॅनर मोनो रेलच्या खांबावर लावून नगर सेवक घोले यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न वाघमारे यांनी केलेला आहे. परंतु या प्रकरणाशी वाघमारे यांचा काहीही संबंध नाही आहे. केवळ येणाऱ्या विधानसभेला काँग्रेस पक्षाकडून वडाळा विधानसभेची तिकीट मिळवण्यासाठी वाघमारे यांनी केलेला हा खटाटोप आहे.

Leave a comment

0.0/5