Skip to content Skip to footer

द मम्मी रीटन्स : पुन्हा पक्षाची धुरा गांधी घराण्याकडे

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत न झाल्यानं सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली. गंमत म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तसंच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असंही स्पष्ट केले होते.

 

शिंदे, चव्हाण नाही तर हा नेता होणार काँग्रेस अध्यक्ष…?

शनिवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत ही नाट्यमयरित्या अध्यक्षपदाची घोषणा झाली. यावेळी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘काँग्रसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.

मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक होऊन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली अशी माहिती दिली

Leave a comment

0.0/5