Skip to content Skip to footer

धनंजय मुंडे यांची पुन्हा जीभ घसरली……

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना, मुंडेंनी एकेरी शब्दात उल्लेख केला. तसेच, गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करताना पिस्तुलराव महाजन अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. काही दिवसापुरी मुंडे यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांना “पिस्तुल्या” या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर टीका केली होती.

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी पैठण येथून सुरूवात झाली. त्यावेळी, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, महापूराच संदर्भ देत सरकार पूरग्रस्तांसाठी किती असंवेदनशील असल्याचेही राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी म्हटले आहे. त्यातच, भोकरदन येथील सभेत बोलताना, धनंजय मुंडेंनी एकेरी भाषेत मंत्र्यांचा समाचार घेतला.

गिरीश महाजन आणि सदाभाऊ खोत यांच्या व्हायरल व्हीडिओवरुन मुंडेंनी दोघांवर निशाणा साधत मड्यावरचं लोणी खाणारी ही लोकं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ”ते पिस्तुलराव महाजन, तुम्ही पाहिलं असेल? पूराच्या गावात सेल्फी काढतायेत, मग जोड्यानं नाही हाणलं पाहिजे का त्याला? एक सेल्फी काढतोय? अशा एकेरी शब्दात मुंडे यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली.

1 Comment

  • Omkar Ramakant Mosamkar
    Posted August 21, 2019 at 6:34 am

    Very good news give by Maharashtra bulletin

Leave a comment

0.0/5