Skip to content Skip to footer

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात ?

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यंदा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. . याबाबत पाटील यांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केला नसला तरी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व कामे त्यांनी पूर्ण केली आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूरमध्ये बाजी मारली होती.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने झेंडा फडकवला होता. त्यात पाटील यांची भूमिकाही महत्वाची होती. मात्र भाजपची ताकद वाढत असली तरी पाटील यांना जनतेने निवडून न दिल्याने विरोधकांनीही त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांना येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हानही दिले. आता पाटील हे आव्हान स्विकारतात का हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. तर भाजपातील मेगा भारती पाहता चंद्रकांत पाटील यांनी स्वतः उमेदवारी घ्यावी असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.

पाटील यांनी राधानगरी, भुदरगड या मतदार संघात विकासाची कामे केली आहेत. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधीही खर्च केला आहे. त्यामुळे पाटील राधानगरी- भुदरगड मतदार संघातुन निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु पाटील ज्या संभाव्य जागेवरून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्या जागा शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

Leave a comment

0.0/5