Skip to content Skip to footer

बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नाव पुसायला निघाली आहे…….

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्याचे खटके वाढलेले दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. भाजप बूथ कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘माझी लढाई कोण्या एका व्यक्तीशी नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे, माझे विरोधक स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, पण मी मात्र तुमच्या सेवेसाठी लढत आहे. तुम्ही मला मतदारसंघाची पहिली आमदार केले आता नामदार करण्यासाठी आयुष्यातला एक महिना माझ्यासाठी द्या असं विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पुढे बोलताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी मला राज्यभर फिरायचे असून माझ्या विजयाची लढाई लढण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. तुम्ही माझे सैनिक आहात, त्यामुळे ही लढाई तुमच्या स्वाधीन करत आहे, बारामतीची मंडळी मुंडे साहेबांचे नांव पुसायला निघाली आहेत, परंतु कितीही प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही, कारण या भागातील जनतेने त्यांच्यावर पोटच्या लेकरासारखे प्रेम केले आहे असं विधान केले आहे.

Leave a comment

0.0/5