Skip to content Skip to footer

“दादा कुछ तो गडबड है!” सामनातून अजित पवारांचा घेतला सेनेने समाचार..!

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनामा देण्याने आणि नंतर भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर होण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. राजकीय पंडितांकडून अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहे. यातच भर म्हणून शिवसेनने सुद्धा अजित पवारांच्या या कृतीचा खास ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती.

जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ”दादा, कुछ तो गडबड है!” असा निशाना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून घेतला आहे.अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच. राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत.

लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ”दादा, कुछ तो गडबड है!”निवडणुका वगैरे आल्या की, राजकारणात वावटळी उठत असतात. श्री. शरद पवार यांनी महाराष्ट्रात अशीच एक वावटळ उठवून दिली. वावटळीचे रूपांतर वादळात होईल, असे वाटत असतानाच पुतणेसाहेब अजित पवार हे आधी अचानक अदृश्य   झाले.आमदारकीचा राजीनामा दिला व दुसऱ्या दिवशी प्रकट होऊन त्यांनी आपल्या अदृश्य होण्यामागची कहाणी पत्रकारांना सांगितली. हे सर्व सांगताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला व त्या अश्रूंचे शिंपण वावटळीवर पडल्याने वावटळ खाली बसली व त्यातून वादळ वगैरे काही निर्माण झाले नाही. ‘
नाट्य’ निर्माण झाले ते राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात. या नाट्याचे दिग्दर्शन केले सक्त वसुली संचालनालय म्हणजे ‘ईडी’ने. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख ‘ईडी’ने करताच पवार यांनी ‘ईडी’ कार्यालयाच्या दिशेने कूच करण्याचे ठरवले.
त्यासाठी युद्धाचे नगारे वाजवले, शंख फुंकले, रणभेदी आरोळ्या व धुरळ्याने आसमंत गढूळ झाला. ‘महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही’ अशा मराठीजनांस प्रिय असलेल्या संवादफेकीने शरद पवार यांनी माहौल मस्त तयार केला. महाराष्ट्रातून असंख्य वतनदार खाशा फौजा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी रोखले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’रूपी अफझलखानाचा कोथळा काढायचाच असे ठरले.

Leave a comment

0.0/5