Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना आरपीआय (डेमोक्रॉटिक) गटाचा पाठिंबा…….

राष्ट्रवादी पक्षाचे मावळ मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके सध्या मावळ मतदार संघात चर्चेचा विषय बनत चालले आहे. शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जनतेने दिलेली साथ पाहून यंदा सुनील शेळके हे अधिक मताधिक्त्याने निवडणून येणार असाच कटाक्ष बांधला जात आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना जनतेने दिलेला पाठिंबा पाहून शेळके लाखोंच्या फरकाने निवडून येणार असेच चित्र येणाऱ्या २४ ऑक्टोबरला दिसून येणार आहे.

आता सुनील शेळके यांच्या उमेदवारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (डेमोक्रॉटिक) सुद्धा आपला पाठिंबा दर्शविला आहे. पिपरी-चिंचवड लोकसभा प्रभारी विनोद अशोक विधाटे यांनी शेळके यांना मावळ मतदार संघात आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र शेळके यांना दिले. यावेळी मावळ तालुका अध्यक्ष राहुल सोनावणे, पिपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5