Skip to content Skip to footer

पुणे महानगर पालिका त आणखी दोन नवीन विभागांची भर

पुणे एकात्मिक सायकल आराखडा आणि मोबाइल ऑप्टिकल केबलसाठी महापालिकेत दोन नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना पुणे महानगर पालिका त करण्यात आली आहे.

आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले असून ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाची जबाबदारी अधीक्षक अभियंता विजय शिंदे यांच्याकडे, तर सायकल विभागाची जबाबदारी अधीक्षक अभियंता नरेंद्र साळुंखे यांच्याकडे असेल.

या दोन्ही पुणे महानगर पालिका विभागांकडे या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

ऑप्टिकल फायबर विभा

  • शहरात इतर कंपन्यांबरोबर ऑप्टिकल फायबर जाळे निर्माण करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे.
  • शासकीय, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रकल्पांसाठी खोदाई करताना ती नियमानुसार होते की नाही, हे पाहणे. केबल डक्‍ट टाकणे व इतर खोदाईबाबत समन्वय ठेवणे.
  • प्रकल्प राबविणे, त्याच्या मान्यता, देखभालीवर नियंत्रण ठेवणे.
  • उत्पन्नाचा नियोजन प्रकल्प तयार करणे.

https://maharashtrabulletin.com/pune-metro-route/

सायकल विभाग

  • सायकल आराखडा अंमलबजावणी, योजनेशी संबंधित इतर विभागांशी समन्वय.
  • योजनेस लोकसहभाग मिळावा, यासाठी प्रयत्न करणे.
  • शहरात सायकलींना वाहतुकीसाठी प्राधान्य मिळवून देणे.
  • सायकल मार्गांची विकास आराखड्यात आखणी करणे.
  • तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्फत योजनेवर नियंत्रण राखणे.

Leave a comment

0.0/5