Skip to content Skip to footer

काँग्रेसमुळे राज ठाकरेंना महाआघाडीत घेऊ शकलो नाही

काँग्रेसमुळे राज ठाकरेंना महाआघाडीत घेऊ शकलो नाही – अजित पवार

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (काँग्रेस+राष्ट्रवादी) महाआघाडीत घेण्यासाठी आम्ही उस्सुक होतो. परंतु काँग्रेस नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. अशा भावना राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या. एका खाजगी मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यामुळे अजून सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता राज ठाकरे यांच्या बद्दल बदलेली दिऊन येत नाही.

लोकसभा निवडणुकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात न उतरवता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात राज्यभर अनेक सभा घेतल्या होत्या. “लाव रे व्हिडिओ”च्या माध्यमातून अक्षरशः भाजपा पक्षाचे वाभाडे काढले होते. राज्यभर १० मोठ्या जंगी सभा घेत भाजपाच्या विरोधात जोरदार प्रचार सुद्धा केला होता. या सर्व सभेचा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला फायदा पोहचणार होता.

परंतु एका खाजगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाआघाडीत मनसे का सामील नाही या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षा बरोबर महाआघाडीचे मित्र पक्ष सुद्धा मनसेला सामील करून घेण्यासाठी उस्सुक होती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यास विरोध दर्शविला होता.

हे ही वाचा :-शिवसेनेचा वचननामा जाहीर

शिवसेनेचा “वचननामा” जाहीर

Leave a comment

0.0/5