Skip to content Skip to footer

राज ठाकरेंच्या सभाच इव्हेंट मॅनेजमेंट चांगले, पण मतं मिळत नाहीत

राज ठाकरेंच्या सभाच इव्हेंट मॅनेजमेंट चांगले, पण मतं मिळत नाहीत – मंत्री आठवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे इव्हेंट मॅनेजमेंट चांगले असते. परंतु त्यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरताच चांगला असतो. त्यांना मतं मिळत नाहीत, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

राज ठाकरे यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरता आहे. त्यांनी कल्याण, उल्हासनगरमध्ये सभा घेतल्या. त्यांच्या सभांसाठी चांगलं इव्हेंट मॅनेजमेंट केलं जाते. ते महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहेत. चांगले नेते आहेत. परंतु त्यांना हवी तितकी मतं मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना विरोधीपक्षाचं नेतृत्व मिळणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली, पण निवडून येण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे तिसरी शक्ती निर्माण होईल असे वाटत नाही. त्यामुळे तिसरा प्रयोग करुन मतं वाया घालवण्यापेक्षा त्यांनी एका आघाडीत सामील व्हाव. त्यांनी महायुतीत यावं, असे आवाहन मी केले होते, असंही आठवले म्हणाले. मला सत्ता ही स्वतःसाठी नको असून समाजासाठी हवी आहे, असंही ते यावेळी म्हणाले. कल्याण पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारसभेसाठी रामदास आठवले कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात आले होते.

हे ही वाचा-:

पृथ्वीराज चव्हाणांचा कारभार वांझोटा

Leave a comment

0.0/5