Skip to content Skip to footer

“अब कि बार १०० के पार” शिवसेनेचे भाकीत सत्यात उतरणार

“अब कि बार १०० के पार” शिवसेनेचे भाकीत सत्यात उतरणार
विधानसभा निवडणुकीचे मतदान संपताच अनेक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुती दोनशेच्या आसपास जागा मिळवेल आणि महाआघाडी शंभरीदेखील गाठू शकणार नाही, अशी आकडेवारी बहुतांश एक्झिट पोलमधून पुढे आली आहे. न्यूज-१८ आणि आयपीएसओएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला ऐतिहासिक यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला १४१ जागा मिळतील, असा अंदाज न्यूज-१८ आणि आयपीएसओएसने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला तब्बल १०२ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या ३९ ने वाढणार आहे. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहे.

भाजपसोबत युती केल्यापासून गेल्या ३० वर्षांमध्ये शिवसेनेने प्रथमच इतक्या कमी जागा लढवल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच इतक्या कमी जागा लढवूनही शिवसेना राजकीय इतिहासात प्रथमच शंभरी पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a comment

0.0/5