Skip to content Skip to footer

राजू शेट्टी यांच्या चुकांमुळेच माझा विजय झाला – खा. धैर्यशील माने

माजी खासदार राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला आहे, अशी कबुली नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वास कोल्हापुरात बोलताना त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत एका नवख्या उमेद्वाराकडून शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खा. धैर्यशील माने यांच्या विषयी चर्चा होत आहे.

कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच छत्रपती शाहूं महाराजांच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5