Skip to content Skip to footer

“मी पुन्हा येईन” , “मी पुन्हा येईल” असा सारखे म्हणणार नाही कारण पुढेच २५ वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल

मी पुन्हा येईन” असं सारखे म्हणणार नाही कारण पुढेच पाच काय तर पुढील २५ वर्ष मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा असेल. असा विश्वास शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चालू ठेवला. किमान समान कार्यक्रमा’वर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत.

आम्ही २४ तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल’ असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. मी सारखं “पुन्हा येईन” , “पुन्हा येईन” असे म्हणणार नाही असे बोलून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. महाराष्ट्राच्या जनतेशी आमचं पाच वर्षांचं टेम्पररी नातं नाही. आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार असे संजय राऊत म्हणाले.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ का नाही दिला? आम्हीच “भारतरत्न”ची मागणी केली होती, असे संजय राऊतांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर सूचक भाष्य केले.

काँग्रेस नेत्यांचे, वसंतदादा पाटील यांचे स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान असल्याचे आम्ही कायमच सांगत आलो आहोत, असेही राऊत म्हणाले. वाजपेयी पहिले सरकार, शरद पवार १९८० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते पुलोद सरकारही संमिश्र होतं. पवार काँग्रेस विचारधारेचे होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप-जनसंघाचे नेते होते, अशी आठवणही राऊतांनी करुन दिली.

Leave a comment

0.0/5