Skip to content Skip to footer

टाळी एका हाताने वाजत नाही, माजी मंत्री आनंद गीतेंचा भाजपाला टोला

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दिलेले सत्ता सामान वाटपाचे वचन भाजपाने पाळलेले नाही. त्यामुळे शिवसेनेनेला वेगळ्या मार्गाने जावं लागत आहे. भाजपाने दिलेले वचन पळाले असते तर ही वेळ आलीच नसती. त्यामुळे टीका करून आता काही उपयोग होणार नाही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही असा टोला माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. या बाबत त्यांनीं पत्रकार परिषद आयोजित केली होती.

हिंदुत्वादाच्या मुद्दयावर युती झालेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणे बरोबर आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते बोलत होते. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. आज महाराष्ट्राच्या हिताचे लक्षात घेता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. युती तुटल्याने जे घडले ते घडले ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. जरी तीन पक्षांच्या विचारामध्ये साम्य असले तरी ते घेणारे निर्णय हे महाराष्ट्राच्या हिताचे असतील असे मत गीते यांनी मांडले होते.

भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्री पद न देणे हे योग्य आहे का? असे गीते यांना पत्रकारांनी विचारता गीते म्हणाले की, यात भाजपाला काय वाटते हा भाजपचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. माझ्या संघटनेच्या बाबतीत मी भूमिका मांडणे योग्य आहे. गेल्या पाच वर्षात आम्ही सत्तेत होते. तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती यात खूप मोठा फरक आहे असे मत गीते यांनी मांडले होते.

Leave a comment

0.0/5