Skip to content Skip to footer

मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला वारकऱ्यांना मानाचे स्थान….

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तो सोहळा राष्ट्रपती भावणात पार पडला असून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा रंगतदार सोहळा पार पडला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी आणि मंत्रिमंडळाला शपथ दिली. या सोहळ्याला अनेक मित्रदेशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते.

दरम्यान,या सोहळ्याला विविध धर्म संप्रदायातल्या मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं. वारकरी संप्रदायातल्या ११ मान्यवरांना खास या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत (राणा) महाराज वासकर, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, निवृत्ती महाराज नामदास, चैतन्य महाराज देहूकर, विठ्ठल महाराज चवरे, हरी महाराज लबडे, महेश महाराज भिवरे, गणेश महाराज कराडकर, भागवत महाराज हंडे, शाम महाराज उखळीकर, विरेंद्र महाराज उत्पात यांना खास निमंत्रण देण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5