Skip to content Skip to footer

गोव्यातही राजकीय भूकंप होणार -संजय राऊत

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील आमदार विजय सरदेसाई यांची सकाळी भेट घेतली या भेटीमुळे गोव्यातील राजकारणात आणि भाजपच्या गोटात खळबळ माजलेली दिसून येत आहे. या भेटीनंतर तेथील पत्रकार माध्यमांशी संवाद साधतांना “गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असे सूचक वक्तव्य राऊतांनी केले आहे. “गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आज विजय सरदेसाई यांच्या बरोबर इतर आमदार येथे उपस्थित आहे. सरकारला पाठिंबा देणारे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे राऊतांनी स्पष्ठ केले.

संजय राऊत यांनी सांगितले की, सुधीर ढवळीकरांशीही बोलणे चालू आहे. गोव्यातील सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभे आहे. गोव्यात लवकरच फार मोठा बदल झालेला दिसून येईल. असे संजय राऊत म्हणाले. गोवा नाही तर संपूर्ण देशात हालचाल झालेली दिसून येईल.
बिगर भाजपाई एक मोठी आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विजय सरदेसाई आणि सुधीर सुधीर ढवळीकर हे गोव्याचे उपमुख्यमंत्री होते. गोव्यात नवीन फ्रंट तयार होत आहे. आताचे गोव्याचे मुख्यमंत्री सावंत आमच्याकडे बोट दाखवत आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेलो म्हणून सांगत आहे. या भेटीमुळे संजय राऊत आता महाराष्ट्राबरोबर गोव्यात सुद्धा आपल्या कामगिरीची जादू दाखवणार असेच जाणवते.

Leave a comment

0.0/5