Skip to content Skip to footer

शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेच्या अथक प्रयत्नांना लक्षणीय यश – मयूर चंद्रकांत कांबळे

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेमार्फत केल्या जाणाऱ्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून जवळपास ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या प्रधान कार्यालयाची इमारत देवनार येथे दिमाखाने उभी राहणार आहे.

विशेष म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे कार्यालय उभारणीसाठी १९७८ सालीच प्रशासनाकडून देवनार येथे भूखंड देण्यात आलेला आहे, मात्र इमारत उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव हा सरकारच्या लाल फितीतच गुंडाळून ठेवल्याच्या अवस्थेत होता आणि दुर्दैवाने ताबा मिळवल्यावरही कार्यालयाची इमारत उभारणे शक्य झाले नाही.

दरम्यान महामंडळाचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी प्रधान कार्यालयासाठी नरिमन पॉईंट येथे भाड्याने जागा घेणे भाग पडले आणि जो निधी चर्मकार समाजाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला जात होता, त्यापैकी बहुतांश निधी हा इमारतीच्या भाडे भरण्यासाठीच खर्ची व्हायचा, अशी बिकट अवस्था महामंडळाची होती.

गेली अनेक वर्षांपासून शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे हे सर्व प्रशासकीय स्तरांवर उपरोक्त प्रशासकीय कार्यालय उभारण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान शिवसेना उपनेते व म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी या दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या समस्येची खोलात शिरून दखल घेतली व आज बृहन्मुंबई महानगरपालिका म्हाडा, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व लिडकॉम या सर्व प्राधिकरणातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली.

गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा घेता येणार लाभ – मयूर चंद्रकांत कांबळे.

सदर बैठकीमध्ये या प्रधान कार्यालयासंदर्भात सकारात्मक चर्चा घडून आली असून म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी बैठकीत महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर नोंद करून या ठिकाणी कार्यालयाची इमारत उभारणेकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.

संत शिरोमणी रोहिदासजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मयूर कांबळेंनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

या बैठकीला शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश डिंगळे, लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण झैद, मुंबई महानगरपालिका मालमत्ता विभागाचे व म्हाडाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Leave a comment

0.0/5