Skip to content Skip to footer

फोडाफोडीचा आम्ही प्रयत्न केला तर भाजप रिकामी होईल – नवाब मलिक

राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नवे मुख्यमंत्री झाले. शिवाजी पार्क मैदानात अर्थात शिवतीर्थावर नव्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडून शपथ ग्रहण केली. मात्र स्पष्ट जनादेश असूनही भाजपला बहुमत सिध्द करता आले नाही. दरम्यान, भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारचा शपथविधी अवैध असल्याचा आरोप केला आहे. तसेच, नवे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारने विधानसभेचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

सरकारने विधानमंडळाच्या सर्व नियमांची पायमल्ली केली आहे. असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. तर महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाची भीती आहे, अनेक आमदारांना कोंडून ठेवलंय, गुप्त मतदान घ्या, दूध का दूध पानी का पानी होईल. असेही ते यावेळी म्हणाले.परंतु कॉंग्रेस चे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर सडेतोड उत्तर दिले आहे.

भाजप जर तोडफोडचे राजकारण करणार असेल तर भाजपचे अनेक आमदार हे काँग्रेस राष्ट्रवादी मधून गेले आहेत.आता भाजप सत्ता आली नाही तर ते आमदार परत यायला तयार आहेत. ते परत आले तर भाजप रिकामी होईल. या शब्दात नवाब मलिक यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच, भाजपने आमचं आव्हान स्वीकारावं, त्यांचे ११९ चं संख्याबळ दाखवावे, असे आव्हानही दिले आहे.

Leave a comment

0.0/5