Skip to content Skip to footer

राजे तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेतले आणि माझे पण….

भाजपा नेते छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे एका कार्यक्रम दरम्यान एकाच स्टेजवर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना मिठी मारली. या दोन नेत्यांच्या भेटीचे वृत्त सर्व माध्यमांवर चांगलेचं प्रसिद्ध झाले.आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून शशिकांत शिंदे त्यांनी ट्विट करत या भेटीबाबतचा खुलासा केला आहे. शेलार नावाच्या कार्यकर्त्यांचे भिवडी येथे लग्न होते.

त्यावेळी मी तिथे गेलो होतो. एका बाजूला उभा असताना छत्रपती उदयनराजेंनी येऊन मला मिठी मारली. सॉरी चुकलो असं दोन वेळा ते म्हणाले, मी त्यावर काही प्रतिसाद दिला नाही. पुढे त्यांना म्हणालो की, तुम्ही स्वत:चे नुकसान करुन घेतले आणि माझेही केले. २० वर्षाच्या राजकारणात माणूस कष्ट करुन निवडून यायला जातो त्यावेळेस आज जर निवडून आलो असतो तर पवारसाहेबांनी खूप मोठी संधी दिली असती. त्याला मुकलो आहे अशी खंत व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5