Skip to content Skip to footer

आता फडणवीसांना जास्त देवपूजा करावी लागेल – बाळासाहेब थोरात

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवसांनी मनासारखे होण्यासाठी जास्त देवपूजा करावी असा खोचक सल्ला काँग्रेस प्रदेशाद्यक्ष तथा महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी ते माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी बोलताना थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ च्या वाक्यावर थोरात यांनी टोला लगावला. थोरात म्हणाले, ‘फडणवीस ‘मी पुन्हा येईल’ म्हणाले परंतु आले नाहीत, असा टोला थोरातांनी फडणवीसांना लगावला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विरोधी पक्षात बसणार नाही म्हणाले मात्र, विरोधी पक्ष नेतेच झाले. त्यामुळे त्यांनी त्यांचे बोलणे कधीतरी खरे होऊ देत, अशी मागणी देवाकडे करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी देवपुजा वाढवावी, असे थोरात म्हणाले. दरम्यान, ‘पाच वर्षे सरकार चालवायचे आहे, यामुळे वेळ लागणारच आहे. खाते वाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येणार आहे. आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करत आहेत,’ असे खातेवाटपाबाबत थोरातांनी सूचक संकेत दिले.

Leave a comment

0.0/5